साक्री ! Sakri/SKpublicvoice
प्रतिनिधी / अकील शहा
साक्री : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक श्री.अर्जुनजी टिळे यांच्या सुचनेनुसार दिनांक 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2022 पर्यंत वाढदिवस सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
दरम्यान आज दि.16 डिसेंबर 2022 रोजी धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री तालुक्यातील सुरपान येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महा.प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे सरचिटणीस गिरीश नेरकर व धुळे जिल्हा राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव ठाकरे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र उत्तमराव मराठे हे होते,प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रा.नरेंद्र तोरवणे हे होते.
त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे सरचिटणीस गिरीश नेरकर धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव ठाकरे, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे सरचिटणीस नितीन सोनवणे साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख हरीश मंडलिक, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भैय्या साळवे, साक्री शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष पराग आहिरराव, गावातील प्रतिष्ठित नागरिक काशिनाथ कौतिक सोनवणे,सतीश सखाराम सोनवणे व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. रोहिणी देवरे,शिक्षिका श्रीमती.ललिता देसले, श्रीमती वर्षाराणी साळुंखे, श्रीमती,रूपाली पवार, शिक्षक भास्कर खरे त्याचबरोबर अन्य नागरिक हजर होते.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत होता तर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांनी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹

