सेंट्रल बँक ऑफ इंडिया खापर शाखेत १११ वा स्थापना दिवस साजरा


अक्कलकुवा ! Akkalkuwa/SKpublicvoice 
प्रतिनिधी/ अल्ताफ मलकानी 
         

    खापर येथील सेंट्रल बँक इंडिया शाखेत बँकेच्या १११व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने शाखेत बँकचे संस्थापक सोराबजी पोचखानवाला यांच्या प्रतिमेला शाखाधिकारी सिद्धार्थ साळवे,लेखापाल आदित्य कुमारसिंग,सबस्टाफ कन्हैयालाल मराठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व केक कापून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
         
       भारतीयांची बँक,भारतीयांनी,भारतीयांसाठी पहिली स्वदेशी बँकेला १११ वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजेच ता.२१ डिसेंबर १९११ रोजी स्थापन करण्यात आले होते. सोराबजी पोचखानवाला हे पारशी व्यक्ती ज्यांनी बँकेची स्थापना केली होती.ही देशातील पहिली बँक होती,ज्याची संपूर्ण मालकी आणि व्यवस्थापन भारतीयांच्या हातात होते.



⚫🟢⚪🔵🟣🟠🟤🔴🟡⚫🟢⚪🔵🟠

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post