३० ग्रामपंचायतींच्या मतमोजणीच्या निकाल आज (ता.२०) डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला.

अक्कलकुवा ! Akkalkuwa/SKpublicvoice 
 
प्रतिनिधी /अल्ताफ मलकानी
        
       अक्कलकुवा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायती पैकी पेचरीदेव ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध झाल्याने ३० ग्रामपंचायतींच्या मतमोजणीच्या निकाल आज (ता.२०) डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला.यात शिवसेना ९,काँग्रेस ९,भाजपा ७,अपक्ष ४ तर शिवसेना शिंदेगटने एका ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील व तहसीलदार रामजी राठोड,निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे,अक्कलकुवा सहा.पोलीस  निरीक्षक राजेश गावीत उपस्थित होते.

निवडलेल्या सरपंचांची नावे अशी-
खापर:किरण जयसिंग पाडवी,
पोरांबी:संगीताबाई नरेश वळवी,
डेब्रामाल:अनुमती लक्ष्मण वळवी,
कुकडीपादर:संगीता धरमसिंग नाईक,
डणेल:संदीप कालुसिंग पाडवी,
मणिबेली:मुंगीबाई दिलवरसिंग वळवी,
मोलगी:ज्योती प्रदीप तडवी,
भगदरी:पिरेसिंग भीमसिंग पाडवी,
भाबलपूर:चंपाबाई श्रीकृष्ण पाडवी,
घंटाणी:विवेक जेका पाडवी,
विरपूर:अजित सुभाष तडवी,
सोरापाडा:अंजू आमश्या पाडवी,
अलिविहिर:कुंताबाई किसन नाईक,
बिजरीगव्हाण:कविता किरण पाडवी, खडकुणा:मोगराबाई दशरथ वळवी,
टावली/उमरकुवा:बबीता राजेंद्र वसावे,
मंडारा:हेमलता सुनील राव,
खाई:संपत कालुसिंग पाडवी,
कोवलीमाळ:खुमानसिंग बिज्या तडवी,
कंकाळामाळ:शकुंतला जयसिंग तडवी,
कुवा:मगन दातक्या वसावे,
बेडाखुंट:दिनकर मांग्या वळवी,
बोखाडी:कुलवंतीबाई खुमानसिंग तडवी,
वडीबार:गणपत चमऱ्या वळवी,
अक्कलकुवा:उषाबाई प्रवीण बोहरा,
ओहवा:अलीबाई गणपत पाडवी,
वेली:रमकाबाई रायसिंग वळवी,
उमरागव्हाण:अविनाश कर्मा वसावे,
चिवलउतार:दिनेश खात्र्या वसावे,
माळ:बिंदू मंगलसिंग नाईक

बिनविरोध सरपंच पेचरीदेव : वसंत हुरजी पाडवी सदस्यांसह बिनविरोध.

         

ईश्वर चिट्ठीने झाली निवड-
समान मतदान असणाऱ्या उमरागव्हान येथे एका सदस्यसाठी ईश्वर चिठ्ठीने सोडत काढून निवड झाली.


फोटो-१)निवडून आल्या नंतर जल्लोष साजरा करतांना विजयी उमेदवार व कार्यकर्ते.
२)अक्कलकुवा तहसील कार्यालयात ईश्वर चिठ्ठी काढतांना  तहसीलदार रामजी राठोड, कर्मचारी व समान मते असलेले उमेदवार.



⚫⚪🔵🔴🟤🟣🟠🟢🟡🟤🟣🟠🔵🟡

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post