साक्री शहरात भाजपाच्या वतीने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांचा जाहीर निषेध करण्यात आला.




साक्री !Sakri / SKpublicvoice
प्रतिनिधी/ अकील शहा

  साक्री  : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबाबत पाकिस्तान चा परराष्ट्र मंत्री बिलावल भूत्तो ने न्यूयार्क येथील पत्रपरिषदेत आक्षेपार्ह विधान करून खालच्या स्तरावरील टिका केल्यामुळे साक्री तालुका व शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी- कार्यकर्त्यांनी धुळे जि. प. कृषी, पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली साक्री येथील गोल्डी चौकात बिलावल भूत्तो चे छायाचित्र असलेले पोस्टरची गाढवावरून धिंड काढून पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणा देऊन पोस्टर चे दहन करण्यात आले.

      यावेळी हर्षवर्धन दहिते, साक्री उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, रमेशभाऊ सरक, भाजपा तालुका सरचिटणीस प्रदिपकुमार नांद्रे, उत्पलतात्या नांद्रे, विजय भोसले सर, आबासाहेब सोनवणे, नगरसेवक दिपक वाघ, तालुकाध्यक्ष वेडूआण्णा सोनवणे, इंजि.मोहन सूर्यवंशी,भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी देवरे, कुंदन आबा देवरे, छोटुआप्पा सोनवणे, सामोडे चे रमेशगीर महंत, कळंभीर सरपंच रितेश ठाकरे, किरण बच्छाव, महेशदादा अहिरराव, मुन्ना देवरे, हर्षल बिरारीस, प्रवीण देवरे, चेतन जाधव, ध्रुव अहिरराव, उखाजी साळुंके, निलेश भदाणे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

Post a Comment

Previous Post Next Post