केंद्राच्या पोर्टलमुळे 51 लाख शेतकर्‍यांना लाभ,खा.डॉ.हिना गावित यांची माहिती



नंदुरबार | Nandurbar/SKpublicvoice

प्रतिनिधी/नरेश वळवी 


        केंद्र सरकारच्या  अन्न व नागरी पुरवठा विभागाने केंद्रीय अन्नधान्य खरेदी पोर्टलसोबत  राज्य खरेदी पोर्टलचे एकत्रिकरण करुन शेतकर्‍यांचा धान्याला आधारभूत किंमत देत 452.54 लाख मे.टन धान्याची खरेदी  करण्यात आली आहे. या पोर्टलचा 50.96 लाख शेतकर्‍यांनी लाभ घेतल्याची माहिती खा.डॉ.हिना गावित यांनी दिली.


दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात एकाच दिवशी अन्नधान्याचे रॅक लोड करुन एफसीआयने विक्रम केला आहे.

देशभरातील शेतकरी, गोरगरिब जनतेला अन्नधान्य पुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी सुशासन दिवस साजरा करण्यात आला. या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकाराचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध धोरण राबविण्यात येत आहे. याबाबत माहिती देताना खा.डॉ.गावित म्हणाल्या की, सध्या देशातील 24 राज्यात सीएफपीपी धोरण राबविण्यात येत आहे. त्याच्यात थेट लाभ शेतकर्‍यांना होत आहे.



भारत सरकारने मानवतेच्या दृष्टीकोनातुन अफगाणिस्तानला 50 हजार मे.टन गहु पुरवठा केला. त्याचप्रमाणे मागील वर्षात मादागास्कर, तिमोर - लेस्टे आणि मोजांबिक येथे तांदुळ पुरवठा केला. पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु केल्यामुळे राज्यांना दरवर्षी होणारे 600 लाख मेट्रीक टन धान्य यंदा 1100 लाख मे.टन पर्यंत पोहचले आहे, असेही खा. डॉ. गावित यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात निर्बंध लादले असतांनाही भारतीय खाद्यनिगमने अन्नधान्याचा 400 लाख मे.टनचा नियमीत पुरवठा 600 लाख मे.टनपर्यंत वाढविला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय खान्यनिगमने कोरोना महामारीच्या काळात सुमारे 1450 अन्नधान्याचे रॅक पाठविले.

विशेष म्हणजे 22 एप्रिल 2020 रोजी या एकाच दिवशी 102 रॅक लोढ करण्याचा विक्रम भारतीय खाद्यनिगमच्यावतीने करण्यात आला असून त्याचे कौतुक होत आहे. रेल्वेमार्ग, रस्ता, जलमार्ग, हवाईमार्ग, शक्य त्या मार्गांद्वारे धान्याचा पुरवठा करण्यात आल्याने देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात धान्य पोहोचल्याची माहिती खा.डॉ.हिना गावित यांनी दिली. देशभरातील कुपोषण, अशक्तपणाची समस्या दूर करण्यासाठी फोर्टीफाईड तांदूळ खरेदी करुन त्याचे वितरण राज्यांंना विविध कल्याणकारी योजनांद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगत भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ब्राझिल नंतरचा साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post