तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदासाठी 3 जानेवारी 2023 रोजी मुलाखतीचे आयेाजन…






तळोदा ! Taloda / SKpublicvoice



    तळोदा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धिपत्रकांद्वारे असे प्रसिद्ध केले आहे की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या

शासकीय आश्रम शाळेत प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक रिक्त पदे भरण्यासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी द्वितीय सत्रासाठी रोजंदारी तत्त्वावर मुलाखतीद्वारे नियुक्ती करायची आहे. याकरिता या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रम शाळेतील रिक्त पदावर अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे, तरी अर्हताधारक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे

 

आवाहन मा. प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदासाठी 3 जानेवारी 2023 रोजी  मुलाखतीचे स्थळ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, येथे आयेाजन राहणार आहे.





Post a Comment

Previous Post Next Post