
पळासी ! Nandurbar/SKpublicvoice
प्रतिनिधी/ नरेश वळवी
कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार अंतर्गत कापूस खरेदी केंद्र, पळाशी येथे भारतीय कपास निगम मार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी केंद्र प्रभारी गणेश सोनुणे यांच्या हस्ते करण्यात आला. तर कापसाला ८ हजारावर भाव देण्यात आला. कापूस केंद्र, पळाशी येथे १३० वाहनांमधून कापून विक्रीस आला व साधारणतः १००० क्विंटल कापूस विक्रीस आला होता.
चांगल्या प्रतीच्या कापसाला ८२५० रुपये ते ८४०० रुपयापर्यंत दर सीसीआय मार्फत देण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपला कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा तसेच भारतीय कपास निगम मार्फत खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे संबंधित शेतकरी यांचे बॅंक खात्यावर कुठलीही कपात न करता ३ते ४ दिवसांत जमा होणार आहे.
शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रतीचा कापूस परस्पर विक्री न करता बाजार समितीचे अधिकृत केंद्रावर विक्री करावा, असे आवाहन केंद्र प्रभारी गणेश सोनुणे यांनी केले आहे.याप्रसंगी भारतीय कपास निगमचे प्रतिनिधी के. एल. बघेल व मंगेश किटुकले तसेच परवानाधारक खरेदीदार अशोक चौधरी, गोविंद अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, शिरिष अग्रवाल, सतीश चौधरी तसेच बाजार समितीचे कर्मचारी जितेंद्र पाटील व कालुसिंग वळवी आदी उपस्थित होते.
🟤🔴🟣🟠⚪🟢🟡⚫🔵🔴🟤🟣🟠🟢
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹