लातूर l Latur/SKpublicvoice
लातूर येथे दिनांक 27/ 11/ 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता सुदर्शन न्युज चे संपादक सुरेश चव्हाण यांची हिंदुत्व हुंकार सभा या नावाने सभा होणार आहे हे सभा काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आयोजित केली आहे .इतिहासाच्या चुकीचा संदर्भ मुघलांच्या चुकीचा इतिहास सांगून मुस्लिम समाजाविषयी, इस्लाम धर्म विषयी श्री चव्हाण हे सतत वादग्रस्त बोलत असतात त्यांच्या वक्तव्याने किंवा सभेने इतर समाजामध्ये जातीय तेळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद मार्फत लातूरच्या सभेस प्रशासकीय स्तरावरून परवानगी न मिळावी किंवा प्रशासकीय स्तरावरून पोलीस यंत्रणेमार्फत या सभेवर तात्काळ बंदी घालावी अथवा या संदर्भातील भाषणाच्या लिखित मर्यादा वक्त्याकडून लेखी स्वरूपात घ्याव्यात व त्या प्रसारित कराव्यात . अशा अनेक विषयांवर लातूर जिल्हाधिकारी यांना ॲड. लालासाहेब राजेसाहेब शेख यांच्या कडून निवेदन देण्यात आले.