भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन.


मुंबई l Mumbai/SKpublicvoice


        दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव,  किरण देशपांडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांचासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post