स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन.


सातारा Satara/SKpublicvoice

      

     दि. २५ – राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी समाधी स्थळावरील पर्णकुटी या ग्रंथालयास भेट दिली. तसेच आयोजित भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹





   जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.

     मुख्य संचालक:- श्री सईद कुरेशी 

          📱95 29 25 53 54

Post a Comment

Previous Post Next Post