तळोदा तालुक्यातील चिनोदा परिसरात कापसाला भाव नसून शेतकरी हतबल..


चिनोदा परिसरात कापसाला भाव नसल्याने शेतकरी हतबल

चिनोदा l Nandurbar /SKpublicvoice 

तळोदा तालुक्यातील चिनोदासह (Chinoda) परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड (Cotton cultivation) करण्यात आली होती. आता सर्वत्र कापूस वेचणी (Cotton picking) करण्यात येत आहे. मात्र सद्यःस्थितीत व्यापार्‍यांकडून (merchants) शेतकर्‍यांनी (farmers)पिकविलेल्या या पांढर्‍या सोन्याची (White gold) खरेदी (Purchase)अतिशय तुटपुंज्या व कवडीमोल दरात केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी (Cotton farmers desperate) हतबल झाला आहेदरम्यान यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांपुढे संकट उभे राहिले आहे. कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे किमान 10 हजार ते 12 हजार रूपये प्रति क्विंटल भाव कापसाला मिळावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे. शेतकर्‍यांनी घाम गाळून कपाशीचे पीक जगविले. मात्र सद्यःस्थितीत शेतकर्यांना कापसाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे तो जो भाव येईल त्या भावात शेतकरी कापूस विक्री करतांना दिसत आहेत. कापसाला योग्य हमीभाव मिळत नाही त्यातच अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.कापूस पिकावर सुरूवातीपासूनच शेतकर्‍यांनी अतोनात खर्च केला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीन ते चार महिन्यांपूर्वी कपाशीचे पीक चांगल्या स्थितीत होते. कापसाचे बोंडदेखील फुटण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे कापसाच्या विक्रीतून तरी चांगले उत्पादन येणार या आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांच्या या आशेवर परतीच्या पावसामुळे कापसाची नासधूस होऊन एकरी उत्पादनात मोठी घट आली.कापूस पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. त्यातच सद्यःस्थितीत कापसाला 7 हजार ते 8 हजार 500 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने त्यात एकरी उत्पादनात मोठी घट झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून कापसाला लावलेला खर्च देखील निघणार नसल्यामुळे कापसाला प्रति क्विंटल 10 हजार ते 12 हजार भाव मिळावा अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.परतीच्या पावसामुळे कापसाच्या एकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून त्यातच कापसाची कवडीमोल भावाने खरेदी करण्यात येत असल्याने कापूस या पिकाला लावलेला खर्च सुध्दा निघणार नसल्याने कापसाला प्रति क्विंटल 10 हजार ते 12 हजार भाव मिळावा अशी अपेक्षा आहे असे चिनोदा येथील शेतकरी गणेश मराठे यांनी सांगीतले.शेतकर्‍यांनी घाम गाळून कपाशीचे पीक जगविले. मात्र सद्यःस्थितीत शेतकर्‍यांना कापसाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे तो जो भाव येईल त्या भावात शेतकरी कापूस विक्री करतांना दिसत आहेत.

- अरुण चव्हाण, शेतकरी,चिनोदा

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

        🌹 प्रतिनिधी नेमणे सुरू आहे🌹




जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.

 मुख्य संचालक:- श्री सईद कुरेशी 

         📱95 29 25 53 54


Post a Comment

Previous Post Next Post