सैनिक कल्याण कक्षाच्या अशासकीय संघटक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नंदुरबार l Nandurbar/SKpublicvoice 


         दि. 30  : धुळे येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या नंदुरबार येथील जिल्हा सैनिक कल्याण कक्षातील ‘अशासकीय कल्याण संघटक’ पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

     अशासकीय कल्याण संघटक पदासाठी, सैन्यदलातून सुबेदार मेजर किंवा सुबेदार या पदावरुन सेवानिवृत्त माजी सैनिक अर्ज सादर करु शकतील. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राहुन काम करण्यास इच्छुक असावा. संबंधिताकडे एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण प्रमाणपत्र अनिवार्य असेल, उमेदवार हा निर्व्यसनी व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा. नियुक्ती झालेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचे जादा कामाचे व प्रवास भत्ता देय असणार नाही. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे यांच्या वेळो वेळी संपर्कात राहून धुळे येथील कार्यालयास भेट देणे अनिवार्य राहील. वरील अटी व शर्ती व कामाचे स्वरुपाबाबत शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन देणे  बंधनकारक राहील.

     इच्छुक माजी सैनिकांनी कार्यालयीन वेळेत हस्तलिखित अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 7 डिसेंबर, 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धुळे माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ, धुळे येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02562-237264 येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री.गायकवाड यांनी केले आहे.



🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

        जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा .
         मुख्य संचालक:-  श्री . सईद कुरेशी 
             📱95 29 25 53 54

Post a Comment

Previous Post Next Post