मुंबई l Mumbai/SKpublicvoice
दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक तसेच निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे माहितीपर व्याख्यान शनिवार, दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
ट्विटर- https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
भारतीय संविधानाचे वेगळेपण, देशभरात साजरा केला जात असलेला संविधान दिन, संविधानातील मुलभूत अधिकारांचे वर्णन, संविधानातील मुलभूत कर्तव्यांचा समावेश तसेच संविधानाची वैशिष्ट्ये, भारतीय राज्य घटनेची उद्देशिका याबाबतची सविस्तर माहिती श्री. खोब्रागडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹. 🌹 प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे🌹
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा .
मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी
📱95 29 35 53 54

