नंदुरबारात उद्या पाणीपुरवठा योजनेचे ई-भुमिपूजन पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व शनिमांडळाला शिवसेनेची जाहीर सभा...

नंदुरबारात उद्या पाणीपुरवठा योजनेचे ई-भुमिपूजन

पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शनिमांडळाला शिवसेनेची जाहीर सभा 

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR/SKpublicvoice 

       राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) उद्या दि.२४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शनिमांडळ ता.नंदुरबार येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) जाहीरसभेला ते संबोधित करणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी (mla Chandrakant Raghuvanshi) यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी ३ वाजता शनिमांडळ येथील शनी चौकात बाळासाहेबांचा शिवसेनेची जाहीर सभा होणार असून ना.पाटील सभेला संबोधीत करणार आहेत.

कार्यक्रमाला जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाळासाहेबांचा शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ऍड. राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी केले आहे.



🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

         🌹 प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.🌹


      

         जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा .
          मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी
              📱 95 29 25 53 54

Post a Comment

Previous Post Next Post