
सारंगखेडा l sarangkheda/ SKpublicvoice
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या ७ डिसेंबरपासून श्री दत्त जयंती निमित्त यात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. यातील सर्वांनाच भुरळ घालणाऱ्या चेतक महोत्सवासाठी ६० एकर जागेवर जय्यत तयारी सुरू असून यंदा देशभरातून ३ हजाराहून अधिक अश्व सारंगखेडा येथे दाखल होणार आहेत. अश्वांच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. तर यंदा चेतक एक्वाइन प्रीमियर लीग राबविण्यात येणार आहे.
यावर्षी कोरोनाचे सावट यात्रेवर पडणार नाही म्हणून यावर्षी ३ हजाराहून अधिक अश्व दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी ६० एकरहून अधिक जागा घोड्यांसाठी व्यापली जाणार आहे. घोड्यांना धावण्यासाठी मैदान तयार केले गेले आहे. घोड्यांच्या विविध स्पर्धेसाठी पटांगण सज्ज झले आहेत. आता अश्व प्रेमींना घोड्यांची उत्सुकता आहे.
बाराशे मंडपांची व्यवस्था
चेतक फेस्टिव्हलमध्ये हजारो घोडे दाखल होत असतात. त्यांना उन्ह, वारा, लागू नये यासाठी मंडपाची व्यवस्था केली जात असते. संपूर्ण भारतामध्ये विविध राज्यात घोड्यांची यात्रा भरत असते; परंतु मंडपाची व्यवस्था पाहायला मिळत नाही. परंतु सारंगखेडा येथे घोड्यांसाठी मंडपाची व्यवस्था एकारेषेत व नीटनेटकेपणाने केली आहे. पर्यटकांना घोड्यांच्या विविध प्रजाती पाहता येतील अशी व्यवस्था केली आहे.
या राज्यातून येणार घोडे
घोडेबाजारात भारतातील विविध कानाकोपऱ्यातून घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल होत असतात. तसेच विविध राज्यातून अश्व दाखल होत असतात. प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, महाराष्ट्रसह अनेक राज्यातील घोडे सारंगखेडा यात्रेत घोडे खरेदी विक्रीसाठी येत असतात.
६ हजार संरक्षण पत्रे उभारणे सुरू
चेतक फेस्टिवलमध्ये हजारो अश्व दाखल होत असतात. तब्बल एक महिना यात्रेचे स्वरूप असते. घोड्यांच्या देखभाल करण्यासाठी १ महिन्याहून अधिक वेळ घोड्यांचे मालक त्यासोबत राहत असतात. घोड्यांचा संरक्षणासाठी ६ हजाराहून अधिक स्टीलचा पत्रा लावण्यात आला आहे. स्टीलचा पत्रा तीन स्तरात व एकावरएक लावण्यात आला आहे. १० फूटहून अधिक उंचीचे संरक्षण पत्रे लावले आहेत.
१४ ते ३१ डिसेंबरपर्यंत स्पर्धा
यावर्षी चेतक एक्वाइन प्रीमियर लीग राबवण्यात येत आहे. त्यात घोड्यांचा राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांना संधी देण्यात येणार आहे. स्पर्धेत पोल बेंडिंग, ऑबस्टॅकल कोर्स, बॅरल रेसिंग, टेंट पेगिंग, बॉल अँड बकेट, हॉर्स शो जम्पिंग, हॅक्स गेम, विविध प्रजातीतील अश्व सौंदर्य स्पर्धा होईल. स्पर्धा १४ ते ३१ डिसेंबर पर्यंत असतील.-जयपालसिंह रावल, अध्यक्ष: चेतक महोत्सव सारंगखेडा.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹