
मोलगी Molagi/SKpublicvoice
धडगाव तालुक्यातील त्रिशूल गावातील मोजरापाडा येथील ऊसतोड कामगार भीमसिंग वेस्ता वसावे यांच्या घराला भर दुपारी आग लागून घर पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत पाच बकर्यांची पिले व 50 हजाराची रोकडही जळून खाक झाली आहे.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अचानक दुपारी घरातून धुराचे लोट निघताना आजूबाजूला शेतात काम करणार्या नागरिकांना दिसून आल्यानंतर जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु भिमसिंग वेस्ता वसावे यांचे घर टेकडीवर असल्याने वार्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते.
आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू, महत्वाचे दस्तऐवज धान्य तसेच बकर्यांचे पाच पिल्ले जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
भिसिंग याच्या पत्नी बकर्यांना चारण्यासाठी जवळच्या जंगलात गेल्या व घरी 90 वर्षाच्या आजी घरी एकट्या होत्या. त्यात घरात पाच लहान बकरीचे पिल्लू बांधून ठेवले होते.
दरम्यान, भर दुपारी अचानक घराला लागलेल्या आगीत बकरीच्या लहान पिल्लूंचा भाजून मृत्यू झाल्याने कुटूंबाचे मोठे नुकसान झाले.
कुटुंबाचे कर्ता असलेले भिमसिंग वेस्ता वसावे यांना पक्के घर तयार करण्यासाठी आर्थिक भांडवलाची आवश्यकता होती.म्हणून ऊसतोड मुकादमकडून 50 हजार रुपये मागून घरी पत्नीकडे देऊन ते ऊसतोड मजूरीसाठी पंढरपुर येथे स्थलांतरीत झाले होते. त्या 50 हजाराचीही जळून राख झाली आहे. त्यामुळे पक्के घर बांधण्याची तयारी असतांना आगीने घराची राख झाली असून कुटूंबाचे स्वप्न आगीने हिरावल्याने भिमसिंग वेस्ता पावरा या कुटुंबाच्या संसार उघड्यावर आला आहे.
सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुरज पाडवी, अनिल पावरा, रवी वसावे व गावकर्यांनी केली आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.
मुख्य संचालक :- श्री. सईद कुरेशी
मो 9529255354
