
शहादा Shahada/ SKpublicvoice
शहादा येथील नगरपालिका प्रशासनातर्फे प्लास्टिक बंदी निर्मूलन पथकातर्फे दिनांक २८ नोव्हेंबर रोजी प्लास्टिकच्या पिशव्या व इतर साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यापाऱ्यांवर कारवाई केली. एका दुकानदाराला पाच हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला आहे. तर कारवाईत ४५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
प्लास्टिक पिशव्या व वस्तूंच्या पुरवठा करणाऱ्या न्यू ज्योती प्लास्टिक सेंटर सादिक खत्री पॉपुलर मेन्स वेअर रूपाली ट्रेडर्स चौधरी किराणा स्टोअर्स यांच्याकडून प्लास्टिकच्या कॅरीबॅगा, ग्लास, प्लास्टिकचे कपसह ४५० किलोचे प्लास्टिकचे साहित्य जप्त केले. तर राजेश्वर इंटरप्राईजेस या दुकानदारावर ५ हजार रुपयांचा दंड केला. ही कारवाई मुख्य अधिकारी दिनेश सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, गोटूलाल तावडे, भूषण सोनार, जितेंद्र साळी, यांनी केली. त्यांना सफाई कामगार विभागातील केदार सोलंकी, गणेश मोरे, गणेश पवार, रोहित डोडवे, गौरव गोजरे, राहुल गोजरे, चंद्रकांत संसारे, प्रशांत धामणे यांनी सहकार्य केले.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा .
मुख्य संचालक :- श्री. सईद कुरेशी
📱95 29 25 53 54
