26/11/2022 संविधान दिनी सत्यशोधक शेतकरी सभेचे, साक्री तहसील कार्यालय समोर निदर्शने...

आज दि.२६/११/२०२२ रोजी सत्यशोधक शेतकरी सभेचे, साक्री तहसील कार्यालय समोर निदर्शने
सयुंक्त किसान मोर्चा- दिल्ली शेतकरी आंदोलनाला २ वर्षे पुर्ण होऊन सुद्धा शेतकर्या़ना दिलेल्या लेखी आश्वासनाची पुर्तता न केल्याच्या निषेधार्त केंद्र सरकार विरोधात निदर्शने 
१) शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव ध्या
२) स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा.
३) विज संशोधन बिल २०२२ तात्काळ मागे घ्या
४) लखिमपुर खिरी येथे शेतकरी व पत्रकाराच्या अमानुष कत्तलीस जबाबदार असलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्री मंडळातुन तात्काळ हकालपट्टी आणि कठोर कायदेशीर कारवाई करा.
५) दिल्ली शेतकरी आंदोलनातील  शहीद शेतकरी कुटुबांना मदत द्या.
६) साक्री तालुका अतिवृष्टि घोषित करुन शेतकर्या़ना नुकसान भरपाई द्या.
७) गायरान जमीन वरील अतिक्रमणाबाबत राज्य शासनाने कोर्टात फेर विचार याचिका दाखल करावी
८) वनहक्क कायदा २००६ ची अंमलबजावणी करा. अशा विविध मागणींचे निवेदन महाशय नायब तहसील ( महसुल) राजेन्द्र सोनवणे यांच्या मार्फत राज्यपाल महोदय यांना पाठविण्यात आले.
यावेळी काॅ. किशोर ढमाले,काॅ. सुभाष काकुस्ते, काॅ.यशवंत माळचे, काॅ. मिरुलाल पवार, काॅ. मनसाराम पवार, काॅ. अशपाक कुरेशी, काॅ. जितेंद्र पवार, काॅ. रामलाल गवळी , काॅ. निलाबाई खंडेकर, काॅ. उत्तम महीरे, काॅ. दिलिप ठाकरे, काॅ. राकेश भोसले, काॅ.रमन माळवी, काॅ. किरन पवार,काॅ. पवित्राबाई सोनवणे, काॅ. पोपट माळचे, काॅ. रवींद्र बागुल आदी सत्यशोधक शेतकरी सभेचे कार्यकर्ते सह ४० ते ५० शेतकरी उपस्थित होते.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹


       जाहिरात व बातम्यासाठी संपर्क करा.

          मुख्य संचालक:- श्री सईद कुरेशी

                 📱9529255354

Post a Comment

Previous Post Next Post