गोळीबार सरावाच्या कारणास्तव ईदगाह मैदान परिसरात मनाईजिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत नागरिकांच्या प्रवेशास मनाई...

Big Breking News / SKpublicvoice

गोळीबार सरावाच्या कारणास्तव ईदगाह मैदान परिसरात मनाई
जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री
25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत नागरिकांच्या प्रवेशास मनाई

नंदुरबार : बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर,2022 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने या परिसरात नागरिकांना प्रवेशास मनाई असेल, असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस अधिकारी-कर्मचारी  यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात या कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी  कळविले आहे.


🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

        🌹प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.🌹

जाहिराती व बातम्या साठी संपर्क करा.
मुख्य संचालक:- श्री सईद कुरेशी
मो 9529255354

Post a Comment

Previous Post Next Post