
नंदुरबार Nandurbar/SKpublicvoice
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २७, २८ व २९ नाेव्हेंबर अशा तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना येथील जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावीत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल, लक्ष्मण माळी आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष सामन्यांना प्रारंभ झाला असून चुरशीमुळे क्रीडा प्रेमींना रंगतदार सामने पाहावयास मिळणार आहेत.
नंदुरबार प्रकल्पांतर्गत नवापूर, नंदुरबार व शहादा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांतील प्रत्येकी १२ संघ सहभागी होणार आहेत. क्रीडा स्पर्धेत ५४७ मुले व ५३३ मुली असे एकूण १ हजार ८० खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवशी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, हँडबॉल हे सांघिक खेळ तर दुसऱ्या दिवशी साेमवारी धावणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंच उडी असे वैयक्तिक खेळाचे सामने रंगणार आहेत. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या या क्रीडा स्पर्धेमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा .मुख्य संचालक :-श्री. सईद कुरेशी
95 29 25 53 54